अधिक महिन्यात अन्नदानाचे महात्म्य अधिक महिना हिंदू पंचांगानुसार दर ३ वर्षांनी येतो. याला 'पुरुषोत्तम मास' असे म्हणतात. हा महिना देवाला समर्पित असून या काळात धार्मिक कार्य, देवदर्शन आणि दानधर्म (अन्नदान) करण्यावर भर दिला जातो. हा अत्यंत पवित्र महिना श्री विष्णूला समर्पित असतो.
या महिन्यात केलेली पूजा, जप, दान व सेवा अनेक पटीने फळ देते. दान धर्म केल्याने मनःशांती, सुख व समाधान मिळते. गरिब, गरजूंना अन्नदान केल्यास पुण्य लाभते. तसेच या महिन्यातील सत्कर्म जीवनातील अडथळे दुर करतात. अधिक महिन्यात करण्यासाठी धर्मशास्त्रात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण सध्याच्या धावपळीमुळे अनेकांना ते जमत नाही. परंतू एकादशीला श्री पांडुरंगाची सेवा म्हणून गरजूंना अन्नदान करता येते. यातून पांडुरंगाची सेवा घडते व आत्मशुद्धी होते.
आता अधिक महिना संपण्यास काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे आपण ही अन्नदान करून जास्तीत जास्त पुण्य पदरी घ्यावे. या मासात श्री पांडुरंगाचे भजन, किर्तन व जपजाप्य करावे. विष्णूच्या अवतारांचे ग्रंथवाचन, गुरुचरित्र श्रवण केले जाते. अन्नदान करणे हा पुण्यप्राप्तीचा सुलभ मार्ग होय.
*राम कृष्ण हरी,,🚩👏🏻*

0 Comments