LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढा पोलीसांच्यावतीने घेण्यात आलेले व्हॉलीबॉल सामने संपन्नया सामन्यात 30 संघानी नोंदविला सहभाग.......



मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी ) : मंगळवेढा पोलीस स्टेशनच्यावतीने भरविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोलापूर ग्रामीण पोलीस संघ,व्दितीय क्रमांक शिवप्रतिष्ठान स्पोर्टस,मंगळवेढा,तृतीय क्रमांक दिल से स्पोर्टस मंगळवेढा,चतुर्थ क्रमांक अक्कलकोट पोलीस उपविभाग असे अनुक्रमे क्रमांक या स्पर्धेत पटकाविले आहेत.

मंगळवेढा पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवार दि.4 रोजी भरविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे सायंकाळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या हस्ते उद्घाटन होवून स्पर्धेला सुरुवात झाली. पोलीस व जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच नागरिकामध्ये पोलीसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे हा मुख्य उद्देश या सामन्यामागचा आहे. या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे मंगळवेढा पोलीसांनी प्रथमच आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण 30 संघाने सहभाग घेतला होता.  या स्पर्धेच्या आयोजनासाठी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक कबाडे,तसेच मंगळवेढ्याचे डी.वाय.एस.पी.बसवसराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. सदर सामने संपताच बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे,विनोद लातुरकर,पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे,नागेश बनकर,गोपनीय विभागचे दिगंबर गेजगे,पोलीस हवालदार मनोज खंडागळे,विनायक जाधव, हाके,गंगणे,हजारे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी
मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या मैदानावर आयोजित केलेल्या व्हॉलीबॉल सामन्यातील विजयी संघ छायाचित्रात दिसत आहे. (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

Post a Comment

0 Comments