LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *वाफळे येथे श्री महादेव मंदिर सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन; राजकारण नव्हे, समाजकारणाला प्राधान्य :– खासदार प्रणिती शिंदे*



मोहोळ : मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून मंजूर झालेल्या श्री महादेव मंदिर सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ मंडळी, आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या विकासासाठी काम करणे, हीच माझी भूमिका आहे. जनतेचा विश्वास हीच माझी खरी संपत्ती असून, माझ्या पदाचा उपयोग सदैव जनतेच्या सेवेसाठी करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          या सभामंडपामुळे भाविकांना धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून, भविष्यात गावातील विविध बैठका, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे हे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. 
          मोहोळ तालुक्याच्या सामाजिक व आध्यात्मिक विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, गावागावांत विकासाची वाटचाल सुरूच राहील, असा दृढ संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
          यावेळी देशातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर केंद्र सरकारला लक्ष्य करताना त्या म्हणाल्या की, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज ग्राहकांची लूट, ग्रामीण भागातील लोडशेडींग, शेतकरीविरोधी धोरणे, खते-बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर केंद्र सरकार मौन बाळगत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे आणि गावांच्या विकासाला गती देणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
          माझ्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे. त्यांच्याच कृपेने, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हे सभामंडपाचे काम माझ्या हातून होत आहे, असे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी भगवान शिवशंकर व देवी पार्वती यांची सर्वांवर कृपादृष्टी राहावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.

यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, सरपंच अनिल पाटील, उपसरपंच रागिणीताई पाटील, शिवाजी पाटील, अर्जुन खडूळ, अनिल खडूळ, संतोष पाटील, ज्ञानदेव गडेकर, गणेश नाईकनवरे, महादेव जवंजाळ, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments