आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राज्याचे *मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीससाहेब आणि मा. सौ. अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.*
*या पवित्र सोहळ्यात पंढरपूर नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिताताई भगिरथ भालके* तसेच धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्य श्री. बाबासाहेब माधव माने व सौ. प्रभावती बाबासाहेब माने यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा बहुमान लाभला.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, शेतकऱ्यांचे कल्याण, वारकरी संप्रदायाचे मंगलमय भविष्य आणि सर्व जनतेच्या आरोग्य, आनंद व भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
*"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम!" 🙏🚩*

0 Comments