पंढरपूरः 'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग (पदवी)च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया मंगळवार, दि.०७ जुलै २०२६ पासून सुरु झाली असून ही प्रक्रिया रविवार, दि.१९ जुलै २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयास फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे,' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया मंगळवार, दि.०७ जुलै २०२६ ते रविवार दि.१९ जुलै २०२७ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी बुधवार, दि. ०८ जुलै २०२६ पासून ते सोमवार, दि.२० जुलै २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-१३००/- रु.आणि इतर प्रवर्ग-१०००/- रु.असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याकडे फोन पे, गुगल पे, डेबिट कार्ड यापैकी एक पर्याय सोबत असावा. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन, व्हेरीफिकेशन व कन्फर्मेशन या प्रक्रियेनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, त्यानंतर कॅप फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया सूरू होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशाचा लाभ डिप्लोमा (पदविका) इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.उत्तम अनुसे (मोबा.नं.-.९१६८६५६३६५) व प्रा. पोपट आसबे (मोबा.नं.-७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments