LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*अत्याधुनिक ए आय ड्रोन, अँटी ड्रोन गन व इंटिग्रेटेड कंट्रोल रूम यंत्रणेचा मा. श्री. जी.श्रीधर, पोलीस उप महानिरीक्षक, PCIT, पुणे यांच्याकडून आढावा*


         आषाढी वारी 2026 मध्ये सुमारे 25 ते 30 लाख भाविक येणार असण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाकडून या मोठ्या प्रमाणातील भाविकांना वारी सुलभ व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 
       यामध्ये प्रामुख्याने *माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण* यांच्या संकल्पनेतून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांना सुविधा देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल सज्ज आहे. आषाढी यात्रा कालावधीत येणारे भाविकांची संख्या अचूकपणे टिपण्यासाठी तसेच या भागात गर्दी झाली आहे त्याची माहिती प्रशासनाला तात्काळ देण्यासाठी, त्याचप्रमाणे भाविकांना ड्रोन वर असणाऱ्या साऊंड सिस्टम मधून सूचना देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन चा वापर या आषाढी वारी कालावधीत करण्यात येणार आहे.  तसेच खाजगी ड्रोन धारकांकडून वारी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या घीरट्या घालून अथवा इतर प्रकारे भाविकांची सुरक्षितता तसेच वारीचे पावित्र्य धोक्यात येणार नाही यासाठी अशा खाजगी ड्रोनवर बंदी घालण्यात येणार आहे. याऊपरही पालखी मार्गावर यात्रा कालावधीत खाजगी दोन यांचे उडान झाल्यास ते निष्काशीत करण्यासाठी पोलीस दलाकडून अत्याधुनिक अँटिड्रोनगन चा वापर करण्यात येणार आहे. या सर्व अत्याधुनिक यंत्रणेचा आज रोजी श्री.जी.श्रीधर, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे यांनी पंढरपूर येथे आढावा घेतला. या यंत्रणेचे कामकाज प्रत्यक्षात पाहणी करून त्यामध्ये असणारे सुविधांचा आढावा घेतला त्याचप्रमाणे पोलीस दलास आणखी आवश्यक असणाऱ्या गोष्टीं त्यामध्ये समाविष्ट करणे बाबत सूचना केल्या आहेत. 
        माननीय श्री जी श्रीधर यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात येणारे इंटिग्रेटेड कंट्रोल रूम चा देखील आढावा घेतला या कंट्रोल रूममध्ये सर्व प्रशासनाचे विभागाचे प्रतिनिधी हजर राहून यात्रा कालावधीत घडणाऱ्या बारीक सारी गोष्टीवर  लक्ष देऊन भाविकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवणार आहेत. या इंटिग्रेटेड कंट्रोल रूमचा देखील पोलीस उपमहानिरीक्षक यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून वारीमध्ये येणारे अभिलेखा वरील गुन्हेगारांचे फेस रिकगनायझेशन या  AI तंत्रज्ञानातून करून करण्यात येऊन त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत यंत्रणा उभी केली आहे याचा देखील आढावा त्यांनी घेतला.
       यावेळी माननीय श्री जी श्रीधर पोलीस उप महानिरीक्षक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग,पुणे यांच्यासोबत माननीय श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण माननीय श्री.विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण माननीय श्री.प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, माननीय श्रीमती अंजना कृष्णा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग व इतर पोलीस अधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments