LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एम.बी.ए. प्रवेशासाठी कॅप राऊंड-२ चे ऑप्शन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.७ ऑगस्ट पासून सुरूस्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध




पंढरपूरः 'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एम.बी.ए प्रवेशाची द्वितीय फेरी (सेकंड कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून ते सोमवार, दि. ९ ऑगस्ट  २०२६ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रूटीनी सेंटर (एस.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांनी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग किंवा प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले आहे तसेच प्रथम प्रवेश फेरीत बेटरमेंट केले आहे अथवा प्रथम प्रवेश फेरीत ज्यांना सीट अलॉट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
        सन २०२६-२७ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग किंवा प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी व निश्चिती करणे आदी  प्रक्रिया पूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत. या द्वितीय फेरीमध्ये योग्य आणि पसंतीचे महाविद्यालय अथवा प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या योग्य ब्रँच बाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-२ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून ते सोमवार, दि. ९ ऑगस्ट  २०२६ या कालावधीत स्वेरीमार्फत मोहोळ, आटपाडी, अनगर, मंगळवेढा, सांगोला, करकंब, कुर्डूवाडी, सोलापूर, माढा, अकलूज, टेंभुर्णी, बार्शी, धाराशिव, लोहारा या ठिकाणी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग व प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठीच्या कॅप राऊंड-२ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ठिकाणी स्वेरीचे तज्ञ प्राध्यापक व त्यांचे सहकारी उपस्थित असणार आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक विद्यार्थी व पालकांपर्यंत लवकरच पोहचवले जातील तरी पालक व विद्यार्थ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, वसतिगृह सुविधा, इतर सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, संशोधने, मानांकने या महत्वाच्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या व प्रथम वर्ष एम.बी.ए  च्या दुसर्‍या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर  बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुसर्‍या फेरीच्या जागावाटपानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५), प्रा. पोपट आसबे (७८२१००४६४७) व प्रथम वर्ष एम.बी.ए प्रवेशासाठी प्रा. सागर सरीक (९८९०४ १९०४९) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयास सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाची पार्श्वभूमी, तसेच मिळालेला ऑटोनॉमस दर्जा यामुळे या दुसर्‍याही फेरीला विक्रमी गर्दी होणार आहे, हे मात्र निश्चित.

Post a Comment

0 Comments