LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

# न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी-पंढरपूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



**कोर्टी-पंढरपूर, दि. १५ ऑगस्ट २०२६ :** न्यु सातारा समुह, मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. आणि न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.एस., कोर्टी-पंढरपूर या संस्थांच्या वतीने भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यु सातारा समुह, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम (नाना) महादेव निकम हे उपस्थित होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीनटीन सोल्युशन्स प्रा. लि., हडपसर पुणे येथील सीईओ मा. श्री. राज डुबल, न्यु सातारा समुहाचे सचिव मा. श्री. गोरख बापू पाटील, न्यु सातारा जिल्हा नागरी मल्टी स्टेट मल्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे जनरल मॅनेजर मा. श्री. अनंतराव शंकर निकम, न्यु सातारा समुहाचे संचालक मा. डॉ. लक्ष्मीकांत राजाराम निकम, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्राचार्या मा. डॉ. जागृती राजू पांचाळ, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.एस.चे प्राचार्य मा. डॉ. औदुंबर जोती जाधव आणि न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए.चे प्राचार्य मा. डॉ. एन. एन. तंटक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी-पंढरपूरचे प्राचार्य मा. प्राचार्य विक्रम हणमंत लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी राष्ट्रगीत गाऊन सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून वातावरण भारावून टाकले. 
यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. राज डुबल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "स्वातंत्र्य ही केवळ एक घटना नसून ती एक जबाबदारी आहे. देशाच्या प्रगतीत तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व मेहनतीने कार्य करावे." त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन केले.
तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम निकम यांच्याकडूनही  स्वातंत्र्याचे मूल्य जपत जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य संस्थेमार्फत सातत्याने सुरू राहील, असे सांगून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

संस्थेचे सचिव गोरख बापू पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत सांगितले की, "गेल्या अनेक वर्षांपासून न्यु सातारा समुह शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. स्वातंत्र्यदिन हा आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देतो. विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार आणि राष्ट्रप्रेम अंगी बाणवून एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे." त्यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच 
न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी-पंढरपूरचे प्राचार्य मा. प्राचार्य विक्रम हणमंत लोंढे यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत करून आभार मानले. ते म्हणाले की, "स्वातंत्र्याचा हा ८०वा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये ओळखून कार्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेत असताना नैतिक मूल्ये जपून समाजाच्या व राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे." त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप  प्रतिज्ञा व मिष्टान्न वाटपाने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments