LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा85 हजाराच्या गुटख्यासह तिघांवर गुन्हा दाखल, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची कारवाई




पंढरपूर :

पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात गुटखा, मावा तयार करून विक्री करीत असताना पोलिसांनी छापा टाकून 85 हजार रुपयांचा गुटखा तयार करण्याचे साहित्य जप्त केले असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 15  रोजी   सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर  प्रशांत डगळे यांना माहिती मिळाली की  तुषार रमेश आदमीले रा. गोविंदपुरा हा राहते घरी मामा विक्री करत आहे .सदर ठिकाणी जाऊन आपण कारवाई करावी असे आदेशित  केले. तेव्हा पोलीस कॉ. घायाळ यांनी घरामध्ये पाहणी केली.असता सदर ठिकाणी  तुषार रमेश आदमीले रा. गोविंदपुरा, शंकर विठ्ठल झेंड,  वैभव ज्ञानेश्वर निकम रा. अनिल नगर पंढरपूर असे सुगंधी तंबाखू व कच्ची सुपारी यांचे मिश्रण करून मावा तयार करून विक्री करत असताना मिळून आले आहेत. तसेच त्यांच्याजवळ सुगंधी तंबाखू व कच्ची सुपारी,चुना असे मिळून आलेला आहे सदर ठिकाणी मिळून आलेला माल खालील प्रमाणे.
1) कच्ची सुपारी व सुगंधी तंबाखू मिश्रित तयार मावा 565 पुड्या किंमत 11,300/-रु.

2) गोल्डन सुगंधी तंबाखू 101 पुढे किंमत 50509/-रू.

3) भगवा सुगंधी तंबाखू 44 पुढे किंमत 15400/-रु.

4) कच्ची सुपारी कत्री अंदाजे दहा किलो किंमत  7500/-रू.

5) पांढरा चुना 03 किलो किंमत 300/-रु. असे 
एकूण मिळाला माल 85000/-रू
  सदरचा मिळून आलेला मुद्देमाल  मुद्देमाल व तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कार्यवाहीस्तव मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग यांच्या आदेशान्वये पोह.बनसोडे,पोह. गोडसे  यांच्या ताब्यात दिला आहे

Post a Comment

0 Comments