LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा कॉलेजमध्ये “इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल्स” विषयावर तज्ज्ञ व्याख्यान उत्साहात संपन्न



न्यु सातारा समूह संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक), कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी “इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल्स” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यान दुपारी 12.00 ते 2.00 या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडले.

या तज्ज्ञ व्याख्यानासाठी कोठारी अॅग्रीटेक प्रा. लि. येथील सीनियर मेंटेनन्स इंजिनिअर श्री. अमोल सज्जन पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील ऑटोमेशन आणि कंट्रोल सिस्टिम्स, त्यांचे कार्य, उपयोग तसेच आधुनिक उद्योगांमध्ये त्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या औद्योगिक गरजांबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.

या व्याख्यानास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील द्वितीय व तृतीय वर्षाचे सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पनांचा औद्योगिक क्षेत्राशी संबंध समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि आवश्यक तांत्रिक कौशल्यांची जाणीव होण्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक ऑटोमेशन, पीएलसी, स्काडा, कंट्रोल सिस्टिम्स आणि आधुनिक औद्योगिक अनुप्रयोग याबाबत अधिक माहिती मिळाली.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही. एच. लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विभागप्रमुख श्रीमती आर. एस. पाटील तसेच उपप्राचार्य व अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्री. व्ही. एन. बाड उपस्थित होते. विभागातील सर्व प्राध्यापकांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती. कार्यक्रमाचे तज्ज्ञ व्याख्यान समन्वयक एम. एस. माळी यांनी कार्यक्रमाच्या नियोजन, समन्वय व आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. अमोल सज्जन पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments