LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, सराईत मोटार सायकल चोरास अटक, एकुण 7,70,000/- रुपये किंमतीच्या 22 मोटार सायकली जप्त.



मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांची मिटींग घेवुन त्यांना मोटार सायकलचोरी करणारे सराईत गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणावे तसेच माला विषयी गुन्हे घडणार नाही या करीता माला विषयाच्या आरोपींतावर योग्य ती प्रतिबंध कारवाई करुन गुन्हे नियंत्रणात आणावेत याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री संजय जगताप यांना सुचना देवुन आदेशीत केले होते.

मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी यांचे आदेशाप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस अधीकारी व अंमलदारांचे वेग वगळे पथके तयार करुन गुन्हे उघडकीस आणने कामी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विजय शिंदे व त्यांचे पथक अकलुज शहरात हजर असताना त्यांचा पथकास माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर नामदेव बबन चुनाडी याने पेनुर ता. मोहोळ जि. सोलापूर येथील मोटार सायकल चोरली आहे. सदर मोटार सायकल चोर हा इसम नामदेव बबन चुनाडी असलेचे स्पष्ट झालेने त्याचे ठावठिकाणाबाबत माहिती घेतली असता तो नातेपुते येथे असलेचे बातमीदाराकडून समजलेने सदर बातमीच्या अनुषंगाने सपोनि शिंदे व त्यांचे पथकाने नमुद आरोपी नामे नामदेव बबन चुनाडी रा. अनिल नगर, पंढरपुर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास नातेपुते येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे चोरीच्या मोटार सायकली बाबत विचारणा केली असता, तो प्रथम उडवा उडवीचे उत्तर देवु लागला. त्यानंतर त्यास अधीक विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन विचारपुस केली असता त्याने मोहोळ पोलीस ठाणे गुरनं 858/2025 बीएनएस-2023 चे कलम 303 (2) या गुन्हयातील युनिकॉर्न मोटार सायकल पेनुर ता. मोहोळ येथुन चोरी करुन ती इसम नामे गणेश ऊर्फ नाना साबळे रा. राऊत नगर अकलुज यांना विक्री केली असल्याचे सांगितले.

आरोपी नामदेव बबन चुनाडी याचेकडे आणखीन सखोल विचारपुस करुन तपास करता त्याने सांगितले की, त्याने मोहोळ, टेंभूर्णी, अक्कलकोट, सोलरपूर शहर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्हयातील विविध ठिकाणाहुन वेगवेगळ्या मॉडेलच्या मोटार सायकली चोरी केल्याचे सांगून चोरलेल्या मोटर सायकल पैकी पेनुर ता. मोहोळ येथुन चोरी केलेली निकॉर्न मोटर सायकल ही इसम नामे 1. गणेश ऊर्फ नाना साबळे रा. राऊत नगर अकलुज यांना विक्री केली असल्याचे सांगीतले. व इतर चार मोटार सायकली या 2. तुषार अनिल चव्हाण, रा. राऊत नगर अकलुज यांना दिल्या असल्याचे सांगीतले. तसेच उर्वरीत 17 मोटर सायकल या त्यांनी त्यांचे स्वत:कडे ठेवले असल्याचे सांगीतले. तरी इसम नामे 1. बबन नामदेव चुनाडी, रा. नातेपुते ता. माळशिरस, 2. गणेश ऊर्फ नाना साबळे रा. राऊत नगर, अकलुज ता. माळशिरस, 3. तुषार चव्हाण, रा. राऊत नगर, अकलुज, ता. माळशिरस यांचेकडुन एकुण 7,70,000/- रुपये किंमतीच्या 22 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन, सदर मोटार सायकली बाबत गुन्हे अभीलेख पडताळणी केली असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अ.क्र
जिल्हा
पोलीस ठाणे
गुरनं व कलम

1)सोलापूर ग्रामीण,
मोहोळ पोलीस ठाणे पो. ठाणे
2)858/2026बीएनएस-23 चे क 303 (2)
सोलापूर ग्रामीण
मोहोळ पोलीस ठाणे पो. ठाणे
812/2026 बीएनएस-23 चे क 303 (2)
3)सोलापूर ग्रामीण
अक्कलकोट उत्तर पो. ठाणे
404/2026 बीएनएस-23 चे क 303 (2)
4)सोलापूर ग्रामीण
टेंभूर्णी पो. ठाणे
688/26 बीएनएस-23 चे क 303(2)
5)सोलापूर शहर
जोडभावी पेठ पो. ठाणे
669/26, बीएनएस कलम 303(2)
6)पुणे ग्रामीण
बारामती तालुका पो. ठाणे
404/26, बीएनएस कलम 303(2)
7)पुणे शहर
वाघोली पो. ठाणे
544/26, बीएनएस कलम 303(2)
8)पुणे ग्रामीण
पौड पो. ठाणे
203/26, बीएनएस कलम 303(2)
9)पुणे ग्रामीण
सासवड पो. ठाणे
135/26, बीएनएस कलम 303 (2)
10)पुणे ग्रामीण
 शीक्रापूर पो. ठाणे
489/26, बीएनएस कलम 303 (2)
11)अहिल्यानगर
तोफखाना पो. ठाणे
764/26, बीएनएस कलम 303 (2)
12)अहिल्यानगर
तोफखाना पो. ठाणे
651/26, बीएनएस कलम 305 (ब)
13)सांगली
वीटा पो. ठाणे
134/26, बीएनएस कलम 303 (2)
14)सांगली
कासेगाव पो. ठाणे
134/26, बीएनएस कलम 303(2)
15) सातारा 
कराडा शहर पो. ठाणे
110/26, बीएनएस कलम 303(2)
16)नाशिक शहर
सरकारवाड पो. ठाणे
175/26, बीएनएस कलम 303(2)
17)पुणे शहर
बावधन पो. ठाणे
363/26, बीएनएस कलम 303(2)
18)गुन्हा दाखल करणेवर
19)गुन्हा दाखल करणेवर
20)गुन्हा दाखल करणेवर
21)गुन्हा दाखल करणेवर
22)गुन्हा दाखल करणेवर
एकुण
22 मोटार सायकल
नमुद उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रा., मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रा. श्रीमती प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय जगताप, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे व पथकातील अंमलदार पोहेकों / रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, मपोहेकों/ सुनंदा झळके, पोकों/ अनवर अत्तार, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, सागर ढोरेपाटील, चापोकों/वगरे यांनी बाजवली आहे.

Post a Comment

0 Comments