सांगली- दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘जागतिक कन्या दिन’ साजरा केला जातो. खरं पाहिले तर प्रत्येक दिवसाची सुरवात कन्येचा चेहरा पाहून केल्यास दिवस बहारदार जातो. कन्या ह्या अशा स्वरूपाच्या असतात. त्यामुळे साहजिकच कन्येसाठी पित्याचे ढळते माप असते असे म्हणतात, हे खरे आहे. प्रत्येक पिता आपल्या कन्येबरोबरच फोटो स्टेट्सला ठेवून, कन्येला शुभेच्छा देणारा दिवस काल पाहायला मिळाला. एकीकडे सर्वत्र ‘जागतिक कन्या दिन’ साजरा करत असताना दुसरीकडे मात्र आपले पिता असलेल्या डॉ. बी.पी रोंगे सरांच्या मदतीला त्यांच्या कन्या प्रा. पूजा रोंगे- भोसले ह्या धावत असताना पाहायला मिळाल्या.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांवर येऊन ठेपली असून निवडणुकीच्या निमित्ताने तंत्रशिक्षणातील विविध उपक्रमामुळे राज्यात ज्ञानयात्री म्हणून ओळख निर्माण झालेल्या स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर हे पायाला भिंगरी लावल्यापप्रमाणे पाचही जिल्ह्यातील शिक्षकांशी संपर्क साधत आहेत, हे चित्र पाहायला मिळते. आज इथे तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात असे करत मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून जराही उसंत न घेता शिक्षकांच्या भेटीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे चारही जिल्ह्यांतील शिक्षकांबरोबर संवाद झाला आहे. प्रत्यक्ष भेटीतून ते आपले विचार शिक्षकांसमोर व्यक्त करत आहेत. ही बाब त्यांच्या कन्या प्रा. पूजा रोंगे -भोसले यांच्या लक्षात आली. त्यांनी ‘जागतिक कन्या दिना’च्या निमित्ताने पिता डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मदतीला धाऊन आल्या. प्रा.पूजा रोंगे- भोसले यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे जय भवानी विद्यालय बलवडी, श्री. राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र विद्यालय खानापूर, भूड सिद्धनाथ विद्यालय भूड खानापूर, शेठ च. ग. शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज लेंगरे खानापूर, न्यू इंग्लिश स्कूल वाळूज खानापूर, दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंग दाजी देवकर जुनिअर कॉलेज वेजेगाव खानापूर, न्यू इंग्लिश स्कूल साळशिंगे खानापूर, न्यू इंग्लिश स्कूल गार्डी धानवड खानापूर, जीवन प्रबोधनी विद्यालय नागेवाडी खानापूर, जागृती विद्यालय चिखलहोळ खानापूर, विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय माहुली खानापूर, महात्मा गांधी विद्यालय माहुली खानापूर, नानासाहेब शामरावजी विद्यालय देवीखिंडी खानापूर या १३ शाळांना भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी तेथील शिक्षकांशी संवाद साधून डॉ. रोंगे सरांच्या विचारांचा वारसा तिथे चालविला. तेथील शिक्षकांना देखील प्रा. पूजा रोंगे यांचे विचार पटले असून त्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सकारात्मक बदलाचा विचार पोहोचवण्यासाठी सौ. पूजा रोंगे-भोसले यांनी भेट देऊन शिक्षक व तेथील प्राध्यापक वर्गाशी संवाद साधला. शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि हक्कांच्या लढ्यासाठी प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिक्षक बांधवांनी व्यक्त केला. पुणे मतदार संघातील उपक्रमशील ज्ञानयात्री म्हणून राज्यात ओळख असलेल्या ओळख असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विचारांना सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत असून डॉ.रोंगे सर पुणे विभागातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शिक्षणाशी संपर्क साधला आहे. डॉ. रोंगे सर हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर यांनी पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात मात्र आघाडी घेतली आहे हे स्पष्ट होत आहे. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे, हे मात्र वाढत्या प्रतिसादावरून समजते. एकूणच डॉ. रोंगे सरांकडे शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचे लक्ष लागले आहे तसेच त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेल्या या काळात प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे पाचही जिल्ह्यांत झंझावाती दौरे सुरु असून त्यांना सर्वत्र उस्फुर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. आता त्यांच्या मदतीला त्यांच्या कन्या धावल्या असून त्यांनी खानापूर, आटपाडी मधील शिक्षकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष भेटीवर भर देवून समस्या जाणून घेण्याला आता प्रा.पूजा रोंगे यांच्या माध्यमातून गती मिळाली आहे हे मात्र स्पष्ट होते. डॉ. रोंगे सरांप्रमाणेच प्रा. पूजा रोंगे यांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी प्रा. पूजा रोंगे म्हणाल्या की, ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी, समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी स्वेरीचे सर्वेसर्वा डॉ.बी.पी. रोंगे सर हे कटिबद्ध आहेत. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. तरी यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी डॉ. रोंगे सरांना दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी ते कोठेही कमी पडणार नाहीत.’ अशी ग्वाही मी देते. यावेळी डॉ. रोंगे सरांनी आमदार होण्यापूर्वीच केलेल्या सर्व कामांची त्यांनी माहिती दिली.

0 Comments