‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नाशिक येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांची सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी आपल्या कुटुंबियांसह राहुलजी गांधी यांची भेट घेऊन संवाद साधला. राहुलजींचे प्रेम, आपुलकी आणि कार्यकर्त्यांप्रती असलेला विश्वास या भेटीतून पुन्हा एकदा अनुभवता आला.
माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे ही अविस्मरणीय संधी मिळाली, याचा मनापासून आनंद आणि अभिमान आहे.
नाशिक येथील या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले. संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे, जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देणे आणि आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी या प्रशिक्षणातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
समारोपाच्या दिवशी राहुलजी गांधी यांनी दिवसभर पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा आणि मार्गदर्शन दिले. त्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने प्रत्येक कार्यकर्त्याला नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
“राहुलजी, आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा आहे.”
या प्रशिक्षण शिबिरातून मिळालेले मार्गदर्शन आणि ऊर्जा घेऊन सोलापूरसह महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव संघर्षशील करण्याचा निर्धार!

0 Comments