घरफोडी करणारे सराईत टोळीचा पर्दाफाश करत ०३ आरोपींना अटक करून आरोपींकडून
१०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस ठाणे
अकलूज पोलीस ठाणे
अपराध क्रमांक व कलम
१) गु.र.नं. ५४३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ए), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे
फिर्यादीचे नाव
श्री. जितेंद्र जयंतराव इनामदार वय ५५ वर्षे रा. इनामदारवस्ती, नेवरे ता. माळशिरस जि. सोलापूर
गु. घ. ता. वेळ
गु.दा.ता.वेळ
माहिती प्राप्त
दि. ०८/०८/२०२६ रोजी पहाटे ०५/०० ते दि. ०९/०८/२०२६ रोजी १०/०० वा. चे दरम्यान
दिनांक ०९/०८/२०२६ रोजी २०/३५ वा.
तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदार
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
मा. श्रीमती प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभाग
मा. श्री. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग अकलूज
निरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली
पो.उपनि. विशाल कदम, पो.हे.कॉ. विनोद साठे, शिवकुमार मदभावी, राहूल रणनवरे, तुषार (बबलू) गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा आडगळे, पो.कॉ. सोमनाथ माने, पंडीत गवळे, तुकाराम माने देशमुख, विजय तवटे, सायबर पोलीस ठाणेकडील
पो.कॉ. अजित सुरवसे व स्वप्निल जाधव यांनी केलेली आहे.
अटक दिनांक वेळ दि. ११/०९/२०२६ रोजी १८:२१ वा.
आरोपीचे नाव
१) सागर दिलखुश काळे वय ३६ वर्षे रा. जळोली ता. पंढरपूर जि. सोलापूर
२) आकाश उर्फ पपण्या संभाजी चव्हाण रा. पडसतळ, सांगवी ता. पंढरपूर मुळ रा. बादलकोट ता. पंढरपूर
३) सुरज उर्फ दम्या रवि चव्हाण रा. पडसतळ, सांगवी ता. पंढरपूर मुळ रा. बादलकोट ता. पंढरपूर
जप्त मुददेमाल
१) अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५४३/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याचा नेकलेस (१६.५ ग्रॅम - २,२७,९१०/-रूपये), सोन्याची चैन / लॉकेट (५.०५ ग्रॅम ७१७१०/- रूपये), लहान मुलांच्या सोन्याचे ७ अंगठ्या (१४ ग्रॅम -१,६३,८००/- रूपये)
२) अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५७/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याची चैन (२० ग्रॅम २,८४,८००/- रूपये), सोन्याची अंगठी (१० ग्रॅम - १,१७,०००/- रूपये),
३) अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५०८/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याची अंगठी (५.०१ ग्रॅम - ७१,०००/- रूपये), सोन्याच्या २ लेडीज अंगठ्या (४ ग्रॅम ४६,८००/- रूपये)
४) अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५७७/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याचा लक्ष्मीहार (१६ ग्रॅम ९०,०००/- रूपये), सोन्याची अंगठी (३ ग्रॅम - २०,०००/- रूपये)
असे एकूण १०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्ह्याचो थोडक्यात हकिकत :- दिनांक ०८/०८/२०२६ ते ०९/०८/२०२६ दरम्यान मौजे इनामदारवरती, नेवरे (ता. माळशिरस) येथोल फिर्यादी जितेन्द्र जयंतराव इनामदार यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरातीन्न सोन्याचे दागिने १) ५०,०००/- १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, २) १५,०००/- रूपये ६ ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे लॉकेट, ३) ३०,०००/- रूपये ५ ग्रॅमचे ०२ सोन्याच्या अंगठ्या, ४) ५०,०००/- रूपये १५ ग्रॅम वजनाचा लहान मुलांच्या ७सोन्याच्या अंगठ्या, ५) १०,०००/- रूपये ३ ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे एकूण १,५५,०००/- रूपये किंमतीचे दागिणे चोरून नेले होते. सदरबाबत अकलूज पोलीस ठाणेस गु.र.नं. ५४३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 3.31(3), 331(4)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तांत्रिक विश्लेषण, डम्प डेटा, सीडीआर अॅनालिसीस व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. संशयित आरोपो नामे सागर दिलखुश काळे वय 36 वर्षे, रा. जळोळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हा अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी आकाश उर्फ पप्पण्या संभाजी चव्हाण वय 35 वर्षे, व सुरज उर्फ दम्या रवी चव्हाण वय 24 वर्षे, दोघे सध्या रा. पडसतळ, सांगवी, ता. पंढरपूर, मूळ रा. बादलकोट ता. पंढरपूर यांचे मदतीने नेवरे, यशवंतनगर व स्वरूपनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे व चोरी केलेले सोन्याचे दागिने करकंब ता. माळशिरस येथील सोनार 'श्रीराम गोल्ड व सिल्व्हर पॅलेस' चे मालक शिवराज दीपक गोडसे रा. करकंब, ता. पंढरपूर याला विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर सोनाराकडून एकूण ९,८२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश चव्हाण व सुरज चव्हाण हे त्यांचे राहते घरी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गेले असता आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच पळून जात होते. त्यावेळी त्यांना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ११/०९/२०२६ रोजी गुन्ह्यात अटक करून मा. हु।। न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १५/०९/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई विशाल कदम हे करीत आहेत.
तसेच अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५७७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अकलूज नवीन बस स्थानक येथे फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे बॅगेतून पर्स काढून घेऊन त्यामध्ये असलेले १) ९०,०००/- रूपये १६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २) २०,०००/- रूपये ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ३) ५,०००/- रूपये रोख रक्कम असा एकूण १,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. संशयित
विधीसंघर्षग्रस्त बालकाने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हा अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल एकूण १,१०,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे विधीसंघर्षग्रस्त बालकाचे वडीलांनी तपासाकामी हजर केल्याने ते हस्तगत करण्यात आलेले आहेत.

0 Comments