LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*साताऱ्याचे पोलीस अधीक्षक; निखिल पिंगळे यांना विशेष सेवा पदक**अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेले धाडसी नेतृत्व आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल त्यांच्या या उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यात आला आहे.*




सातारा : गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकपणे आळा घालण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय आणि यशस्वी कार्यवाहीबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आयपीएस निखिल एन. पिंगळे यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असताना नक्षलविरोधी मोहिमांमध्ये धाडसी नेतृत्व, उल्लेखनीय कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठ सेवा बजावल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नक्षलवाद्यांच्या कारवायांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी त्यांनी बजावलेल्या भूमिकेची दखल घेत त्यांना हे विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. शौर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा हा गौरव असून, सातारा जिल्ह्याच्या पोलीस दलासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साताऱ्यासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील सेवेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments