LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्रोत्सवानिमित्त आदर्श प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका व शिक्षिकांचा सन्मान



पंढरपूर(प्रतिनिधी)
नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या सफाई कामगार महिलांचा तसेच मुख्याध्यापिका व शिक्षिकांचा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून कष्टकरी महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजात माणुसकी, समानता आणि श्रमप्रतिष्ठेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
आदर्श प्राथमिक विद्यालयातील स्वच्छता सेविका पार्वती लालबोंद्रे, सविता कुलकर्णी, उमा सुरवसे आणि सौ. प्रीती गोटेकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी या महिला सातत्याने परिश्रम घेत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री घंटी, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका सौ. आदिती देशमुख तसेच शिक्षिका मैत्रेयी केसकर, शीतल शेटे, लक्ष्मी बोडके, तृप्ती वाठारकर, श्वेता डोईफोडे, श्वेता ताड, सौ. दगडे आणि माधवी खासनीस यांचाही सन्मान करण्यात आला.
नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र, आपल्या आजूबाजूला कष्ट करणाऱ्या महिलांच्या कार्याचा आदर करून त्यांना सन्मान देणे हीदेखील स्त्रीशक्तीची खरी उपासना आहे. सफाई कामगार महिला शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात; परंतु त्यांच्या कष्टांची अनेकदा पुरेशी दखल घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका तसेच शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या महिला सेविका या सर्वांचे योगदान समाजासाठी मोलाचे आहे. कोणतेही काम लहान नसते आणि प्रत्येकाच्या कष्टांचा आदर करणे हीच खरी माणुसकी आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सतीशजी पुरंदरे, संस्थेच्या माजी अध्यक्षा वीणाताई जोशी, रेखाताई उंबरकर, डॉ. अनिल जोशी, ॲड. ज्ञानेश आराध्ये, माजी आमदार श्री. प्रशांत परिचारक, रेखाताई भालेराव, श्री. प्रशांत कुलकर्णी, डॉ. तेजस भोपटकर आणि श्री. प्रसाद संत यांनी कौतुक केले.
“माणुसकी हीच खरी पूजा, कष्टाचा सन्मान हीच खरी सेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कष्टकरी महिलांच्या कार्याचा गौरव झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम महिलांचा सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि श्रमप्रतिष्ठा जपणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Post a Comment

0 Comments