पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण यांनी अंमली पदार्थाची व अवैध दारू विकी करणारे आरोपींचा शोध घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचने प्रमाणे पो. नि. संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पथकाला कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. दि. १४/१०/२०२६ रोजी सपोनि / विशाल मुळे व त्यांचे पथक हे मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथाकातील पोकॉ / थोरात व घाडगे यांना त्यांचे गोपनिय बातमिदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, इसम नामे सुधाकर प्रभु मांडवे यांचे मांडवे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापूर येथील पत्राचे शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा ठेवला आहे
सदरची माहिती श्री. संजय जगताप साो, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली असता त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांना सोबत घेवुन पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि मुळे, व त्यांचे पथक, मोहोळ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार व अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांनी गोपनिय बातमिप्रमाणे इसम नामे सुधाकर प्रभु मांडवे रा. मांडवे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापूर यांचे मांडवे वस्ती येथील पत्रामध्ये छापा कारवाई केली असता सदर पत्रा शेडमध्ये १२ पांढरे रंगाचे प्लॅस्टिक पोती मिळुन आहे. सदरचे पोती उघडुन त्यातील पॉकेट तपासुन पाहिले असता त्यामध्ये १) विना लेबल सुगंधित तंबाखु (पिवळया रंगाचे पॉकेट) ५ पोती, एकुण ६०० पाकिटेकिंमत २,४०,०००/- रू व २) ३३२० गुडलक सुगंधित तंबाखुचे ०७ पोती त्यामध्ये एकुण ५६० पाकिटे किमत २,२४,०००/- रू असा एकुण ४,६४,०००/-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने ती जप्त करून पुढील कार्यवाही करीता मोहोळ पोलीस स्टेशन येथे आणुन जमा केली आहे. तसेच सदरचा पत्राशेड हा अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांचेकडील सिलबंद करण्यात आलेला आहे.
सदर बाबत इसम नामे सुधाकर प्रभु मांडवे यांचे मांडवे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापूर याचेविरूध्द मोहोळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९६४/२०२६ भा.न्या.सं.क. २२३,२७४,२७५, १२३ सी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम २३(२) (iv), २७ (३) (E), ३० (२) (A),५९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मोहोळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत
तसेच मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत पोखरापुर येथे इसम नामे दादासाहेब राजाराम नरोटे रा. पोखरापुर ता. मोहोळ जि. सोलापूर हे १७,०००/- रू चे देशी विदेशी कंपनीचे दारू अवैधरित्या विक्री करीत असताना मिळुन आल्याने त्याचेवर मोहोळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९५९/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक, विजय कबाडे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग, सुरज जगताप पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक दिपक पाटील नेम. मोहोळ पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / विशाल मुळे, पोली हवालदार / मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिध्दराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, पोका / राहुल दोरकर, हरिष थोरात व बाळराजे घाडगे तसेच मोहोळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी बजावली आहे.

0 Comments