LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

* दुष्काळात मनसे धावून आली - प्रभाग क्र. १७ मध्ये दिलीप बापू धोत्रे यांच्यावतीने मोफत ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू



*पंढरपूर / प्रतिनिधी*
महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळाची परिस्थिती असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पंढरपूर शहरातही दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तोंडावर दसरा-दिवाळी सण असून बाहेरगावी असलेले नागरिक सणासाठी घरी आले आहेत, मात्र पाण्याअभावी त्यांची गैरसोय होत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने *प्रभाग क्रमांक १७ मध्ये आजपासून तीन टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.*

जोपर्यंत पाण्याची परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत या प्रभागातील सर्व नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितले.

यावेळी सचिन बंदपट्टे, गणेश पिंपळनेरकर, दिनेश पांढरे, रवी सर्वगोड, दादा घोडके, लक्ष्मण रणदिवे, अंबादास वायदंडे, संतोष वाघमारे, संतोष गायकवाड, लखन भांडेकर, पप्पू बंदपट्टे, पप्पू करपे, भाउ माने, सुदर्शन खंदारे, श्रीकांत शिंदे, नागेश इंगोले, भारत पवार, प्रसाद यादव, रंजीत बिनवडे, बापू खिलारे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

Post a Comment

0 Comments