LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्रोत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज





पंढरपूर, दि. २२ : नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पोषाखासह विविध मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत. प्रथा-परंपरेनुसार करण्यात आलेल्या या साजशृंगारामुळे मातेचे रूप अधिकच मनमोहक दिसत असून, भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

यावेळी श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, नवरत्नांचा हार, खड्यांची बिंदी, चिंचपेटी हिरवी, तन्मणी, सोन्या-मोत्यांचे ताणवड, चंद्रहार, मोत्याचा कंठा, पेट्यांची बिंदी, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद, रुळजोड, पैंजणजोड, नथ आदी पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले आहे.याबाबतची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments