LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदेशीरपणे गावठी पिस्टल जवळ बाळगणा-या इसमास अटकदेशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुस, एक मोटार सायकल, असा एकुण १,२२,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.



दि. १९/१०/२०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक, अल्फाज शेख व त्यांचे पथकातील अंमलदार असे कर्तव्यावर हजर असताना, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोसई अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोह. १२६६ सचिन महादेव भांगे, यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, " विमानतळ चे पाठीमागील रोड ते सिध्देश्वर साखर कारखान्याकडे जाणारे ८० फुट रोड वर, सनराईज शाळेसमोरील मोकळया मैदानात, नागनाथ नगर येथे एक इसम त्याचेकडील पांढ-या निळया रंगाची मोटार सायकल क्रमांक: MH-13-DA-7435 वरुन गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला आहे "

सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस बिराजदार, दुपोनि संगीता पाटील व वरिष्ठांना कळविली. पोसई अल्फाज शेख व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार असे मिळाले बातमीतील ठिकाणी कारवाई करणेकामी रवाना झाले. पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे, सकाळी ११:०० वा. चे सुमारास संशयीत इसम नामे हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी वय- ४१ वर्षे, रा. घर नं.२२, शिवगंगा नगर भाग-१, लिडर हॉटेल जवळ, नई जिंदगी सोलापूर यास सोलापूर विमानतळाचे पाठीमागील रोड ते सिध्देश्वर साखर कारखान्याकडे जाणारे रस्त्यावर सनराईज शाळेजवळील परिसरातून ताब्यात घेतले. त्याची व त्याचेजवळ असलेल्या मोटार सायकल क्रमांक MH-13-DA-7435 ची झडती घेतली असता, संशयीत इसम नामे हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी याचे कमेरला एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पॅण्टचे खिशात ०४ जिवंत काडतुसे तसेच मोटार सायकलचे डिक्कीमध्ये आणखी एक गावठी पिस्टल असे त्याचेकडे एकुण दोन गावठी पिस्टल व चार जिवंत राऊंड असा रु. १,२२,०००/- किंमतीचा मुददेमाल मिळून आला.

इसम नामे हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी यास सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्या बाबत विचारता, त्याने त्याचेकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर, त्यास सदरची गावठी पिस्टल, काडतुस हे कोठून कोणाकडून आणले व जवळ बाळगण्याचा उद्देश काय आहे? अशी विचारणा केली असता, त्याने उडवा उडवीची असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे त्यास ताब्यात घेवून, त्याचेविरुध्द पोह. १२६६ सचिन भांगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन, एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ९०३/२०२६ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपी हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी यास अटक करण्यात आली असून, तपासामध्ये त्याने त्याचे जवळ मिळून आलेली दोन गावठी पिस्टल व ४ काडतुसे, पुणे येथील त्याचे ओळखीच्या एका इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने पुढील तपास सुरु आहे.

आरोपी हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी याचे विरुध्द एम.आय.डी.सी येथे शरिराविषयी ०१, महिलाविषयी ०१, असे दोन गुन्हे तसेच जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे फसवणुकीबाबत ०१ असे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख नेमणुक :-एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, प्रितम यावलकर साहेब, पोलीस उप आयुक्त परिमंडळ सोलापूर शहर, अरुण देवकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ सोलापूर शहर, बी. एस. बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन सोलापूर शहर, श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे एम.आय.डी.सी पो.स्टे सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस उप निरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार, राकेश पाटील, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिध्द निंयाळ, एकनाथ उबाळे, सचिनकुमार लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण,अजित माने, अविनाश दिघोळे, अमोल खरटमल,सकलेन मुकादम,अय्याज बागलकोटे,कुमार बोल्ली,महिला पोलीस अंमलदार दिपाली राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments