सोलापूर : दिनांक, ०७ ऑक्टोबर २०२६
मोदी सरकारला वोटचोरीसाठी मदत करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे आंदोलन करणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंका गांधी, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर जवळ तीव्र निदर्शने करण्यात आली.
शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. काही कार्यकर्त्यांचे कपडेही फाटले.
यावेळी कार्यकर्त्यांनी “गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है”, “ज्ञानेश कुमार राजीनामा द्या”, “राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं”, “प्रणितीताई संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं”, “मोदी तेरी हुकूमशाही नहीं चलेगी” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, मतदारांच्या अधिकारांचे रक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा, SIR रद्द करणे, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत या मागणीसाठी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र, प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी मोदी सरकारने पोलिसी बळाचा वापर करून राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, प्रणितीताई शिंदे यांच्यासह शेकडो खासदारांना ताब्यात घेतले. ही लोकशाहीची गळचेपी आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने उत्तरे द्यावीत. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप नरोटे यांनी केला.
लोकशाहीचा आवाज दडपून सत्ता टिकवता येत नाही. आज राहुलजी गांधींना ताब्यात घ्याल, उद्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्याल; मात्र जनतेचा आवाज कायमचा दाबता येणार नाही. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चेतनभाऊ नरोटे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या मूल्यांवर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मोदी सरकारने दडपशाहीचा कितीही वापर केला तरी राहुलजी गांधींचा संघर्ष थांबणार नाही आणि काँग्रेसचा आवाजही दाबता येणार नाही.
लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना अटक करून सरकारला जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढता येणार नाही. मतदारांच्या अधिकारांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आमचा लढा सुरूच राहील, असेही चेतनभाऊ नरोटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, सुशीलाताई आबुटे, माजी स्थायी समिती चेअरमन बाबा मिस्त्री, नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सागर उबाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, रोजगार बेरोजगार विभाग अध्यक्ष रुपेश गायकवाड, यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, विचार सेल अध्यक्ष ॲड. करीमुन्नीसा बागवान, माजी नगरसेवक दत्तु अण्णा बंदपट्टे, सिद्धाराम चाकोते, हरुण शेख, एन. के. क्षिरसागर, रमेश कैरमकोंडा, ब्लॉक अध्यक्ष दिनेश म्हेत्रे, शिवशंकर आंजनाळकर, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, शकील मौलवी, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, ॲड. केशव इंगळे, हासिब नदाफ, गणेश आप्पा नरोटे, मोतीराम चव्हाण, सुरेश हावळे, रमेश फुले, नागेश म्याकल, संजय गायकवाड, पृथ्वीराज नरोटे, संस्कार नरोटे, अय्याज आळंद, शाफी हुंडेकरी, भीमराव शिंदे, मोहसीन फुलारी, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, अंजली मगोंडेकर, रेखा बिनेकर, छाया हिरवटे, धनलक्ष्मी देशमाने, सॉमसन दिनकर, प्रकाश गेंट्याल, रफिक चकोले, राजेश झंपले, नूरअहमद नलवार, ऐजाज बागवान, अस्लम शेख, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, प्रतिक शिंगे, जितराज गरड, शिवाजी साळुंखे, आप्पा सलगर, चंद्रकांत टिक्के, गुलाम शेख, राजकुमार राठोड, ॲड. लक्ष्मण बनसोडे, शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला, अमिद पाटील, नंदकुमार परदेसी, पवन सग्गम, जब्बर शेख, आनंद तावटे, आयन नडिवले, सचिन सुरवसे, सुरेश पडणुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments