प्रतिनिधी
पंढरपूर
आज झरे येथे लोकनेते आ.गोपिचंद पडळकर साहेबांची भाजपा किसान मोर्चा व ऊसदर संघर्ष समिती सोलापूर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा केली व सांगली, सातारा, कोल्हापूर प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना दर देत नाहीत वजन काट्यात तफावत करतात त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्याचे प्रचंड नुकसान होत आहे सांगली कोल्हापूर भागात तिनहजाराच्या पुढे दर मिळतो सोलापूर जिल्ह्यात दोन ते अडीच हजार दर देतात वजन काटा मध्ये प्रचंड तपावत होत असते सरकार दरबारी याकडे कोणी लक्ष देत नाही सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षातील कारखानदार ऊस दर ठरवताना एकत्रित येतात व सगळे मिळून दर ठरवतात व शेतकऱ्यांना लुटतात आम्ही सर्व शेतकरी चळवळीतिल कार्यकर्ते व सर्व शेतकरी संघटना एकत्र येत ऊस दर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे शेतकऱ्यांमध्ये कारखानदाराच्या विरोधात प्रचंड रोष असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे आपण याबाबत च्या वतिने होणार्या आंदोलना सविस्तर माहिती मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे द्यावी सरकारने लक्ष घालून व या कारखादाराना वठणीवर आणावे असी विनंती केली यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर मंगळवेढ्याचे धनाजी गडदे, अमोल खरात यशवंत खरात निळकंठ गडदे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments