परभणी प्रतिनिधी : -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यातील आलेगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या गूळ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले .....
यावेळी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे ,प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, प्रदेश सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे ,राज्य उपाध्यक्ष सतनाम शिंग गुलाटी,
विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस राजू जावळेकर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जागीरदार, इत्यादी उपस्थित होते ...
या भागातील शेतकऱ्यांना उसाचा प्रश्न भेडसावत होता. शेतकऱ्यांचा तो उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गूळ प्रकल्पाची सुरुवात केली असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न सुटणार आहे.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या कार्यक्रमासाठी असंख्य शेतकरी वडीलधारी मंडळी उपस्थित होते..
0 Comments