LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मेंढपाळ यांच्यासाठी मंत्रालयात विषेश बैठक

 मुंबई .प्रतिनिधी : - 




आज मेंढपाळ बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज इतिहासात प्रथमच मंत्रालयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जी यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मेंढपाळ बांधवांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मेंढपाळांच्या विविध समस्यांविषयी सकारात्मक चर्चा झाली. 

चर्चेतील प्रमुख मुद्दे -

१) वनक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी चराई पास देणे.

२) मेंढ्या चारण्यासाठी चरावू क्षेत्र राखीव करणे.

३) पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या वनक्षेत्रात मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी वनक्षेत्र खुले करणे.

४) बंदिस्त व निमबंदिस्त मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.

५) वन रक्षक, गावगुंड व मेंढपाळांच्यात सतत संघर्ष होत असतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे. 

६) पूर्वीपासून वनक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांना कायम रहिवासी करणे.

गेल्या अनेक वर्षापासून मेंढपाळ बांधवांचे प्रश्न प्रलंबित होते परंतु भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार आल्यापासून या विषयाकडे सरकार सकारात्मक पद्धतीने बघत असून लवकरच मेंढपाळ बांधवांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे ही बैठक आमदार पडळकर साहेबांच्या प्रयत्नातून झाली आमदार संजय गायकवाड, माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांचे सह मेंढपाळ प्रतिनिधी व


यावेळी माऊली भाऊ हळणवर ,शारदाताई पांढरे ,शिवदास बिडगर बाबा आटोळे यांचे सह संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख मेंढपाळ बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments