पंढरपूर प्रतिनिधी : -
मोडनिंब ता.पंढरपूर येथे भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या मैदानात सादिक पठाण यास विजेते पदासाठी ७५ हजार रुपये रोख व एक किलो चांदीची गदा भेट देण्यात आली.
मोडनिंब येथील श्री गुरुदत्त बहुद्देशिय सेवाभावी संस्था, अरण येथे निकाली कुस्त्यांचे मैदान भरण्यात आले होते, आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली, प्रथम क्रमांकाची कुस्ती सादिक पठाण आणि प्रवीण कुमार ( पंजाब ) यांच्यात ही कुस्ती ठरली होती यामध्ये पैलवान सादिक पठाण यांनी बाजी मारली आणि ७५ हजार रोख रक्कम आणि १किलो चांदी ची गदा असलेले बक्षीस पटकावले.
पैलवान सादिक हा पेहे तालुका पंढरपूर येथील शिवसेनेचे एकनिष्ठ व कट्टर जेष्ठ शिवसैनिक महंमद पठाण यांचा जेष्ठ सुपुत्र आहे. आज शिवसेना पंढरपूर शहर व तालुका संपर्क कार्यालय, जुना कराड नाका येथे पैलवान सादीक याचा सत्कार भगवा फेटा, भगवी शाल घालून करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, प्रकाश बंडगर, मोहम्मद पठाण, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यावेळी उपस्थित होते.
0 Comments