LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाग्यवंत

 पंढरपूर प्रतिनिधी : - 



         राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी (प्राथमिक) विश्वनाथ तुकाराम भाग्यवंत यांची निवड महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन  करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक मंत्रालय समन्वय समिती सदस्य तथा राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ हे उपस्थित होते.

                 विश्वनाथ भाग्यवंत हे जिल्हा परिषद केद्र शाळा बाळे ता. उत्तर सोलापूर येथे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

     यावेळी राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश प्रवक्ते विश्वासकुमार घोडके, प्रदेश सचिव दत्तात्रय ननवरे,प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय काळेल, मराठवाडा विभाग प्रमुख  प्रभाकर जाधव , सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष नगरसेविका संगीता ताई जाधव ,सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष मोहन आयवळे , व जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी विश्वनाथ भाग्यवंत यांनी सांगितले की, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास आपल्या कार्यातून सार्थ ठरविणार असून    शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments