LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर न.पा. विरोधात आम आदमी पार्टीची गांधीगिरी

 

पंढरपूर (प्रतिनिधी)



पंढरपूर शहरातील अनेक रस्त्यांवर धूळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन गेल्या अनेक दिवसांपासून नागरीकांना या धूळीचा मोठ्या प्रमाणावर ञास सहन करावा लागत आहे या धूळीने नागरिकांना श्वसनाचे व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत याबाबत पंढरपूर नगरपरिषद काही कार्यवाही करताना दिसून येत नाही नगरपरिषदेने नागरिकांच्या कररूपी पैशातून लाखोरूपये खर्च करून एक धूळ गोळा करणारी मशिन खरेदी केली होती परंतु ती मशिन नागरीकांना कधी रस्त्यांवर दिसलीच नाही व जी धूळ गोळा करण्यासाठी आणलेली मशिन होती ती मशिनच नगरपरिषद मुख्याधिकारी  अरविंद माळी यांच्या बंगल्यासमोर धूळखात पडलेली आहे ती मशिन नगरपरिषद अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दुरूस्त करून रस्त्यांवर आणावी व नागरिकांना धूळीपासून चालु असलेल्या नाहक ञासातुन दिलासा देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने या स्विपिंग मशिनची पुजा करून नगरपरिषदेकडे ही मशिन लवकर सुरू करण्याची मागणी केली

Post a Comment

0 Comments