LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक बना :-नरेंद्र पाटील

 

पंढरपुरात नागरी सत्कार


पंढरपूर:(प्रतिनिधी)-



मराठा समाजातील सर्वसामान्य तरुणांना रोजगार मिळावा या हेतूनेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची निर्मिती केली आहे याच माध्यमातून बँकेचे बिनव्याजी कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय करून उद्योजक बना त्यासाठी पाहिजे तेवढे सहकार्य करू असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले

नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्काराचे पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना नरेंद्र पाटील बोलत होते

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे,ह भ प बद्रीनाथ तनपुरे महाराज,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,दास शेळके,

बाळासाहेब सेनेचे जिल्हा समन्वयक महेश साठे,रामचंद्र वाकडे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ,अजिंक्य जाधव,संतोष जाधव,अमोल पवार,शामराव गायकवाड,रविराज मगर,दिनेश घोलप,संजय शिंदे,रोहित शिंदे,अमोल सावंत,सचिन डोरले, आण्णासाहेब आजबे, आण्णा ओमने, प्रभावती गायकवाड,अड प्राजक्ता शिंदे,रतन थोरावत,डॉ संगीता पाटील,सविता चव्हाण,प्रणिती दत्तू आदी उपस्थित होते

नरेंद्र पाटील म्हणाले की मराठा महासंघ कोणत्या राजकीय पक्षावर किंवा उद्योजकावर चालत नाही तर मराठा समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर चालत आहे आण्णासाहेब पाटील महामंडळातून 10 लाखा पर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जात होते त्याची मर्यादा 15 लाख केली आहे परंतु अभिजित पाटील यांनी केलेल्या मागणीचा विचार करून आम्ही 25 लाख मर्यादा करण्यासाठी प्रयत्नशील आहे शिवाय कर्ज घेण्यासाठी पुरुषांना 50 वर्ष वयाची अट आम्ही 60 वर्षा पर्यंत करण्याचा लवकरच निर्णय घेणार आहे तर मागील काळात व्याजाचा परतावा देण्याची मोठी बाकी होती परंतु ती आम्ही कमी केली असून भविष्यात परतावा वेळेत मिळावा यासाठी प्रयत्न करीत असून ट्रॅक्टरसाठी बंद पडलेली योजना लवकरच सुरू करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले

अभिजित पाटील म्हणाले आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळू लागला आहे त्यामुळे महामंडळाची कर्ज मर्यादा 25 लाखा पर्यंत करण्याची गरज आहे यातून शेती पूरक व्यवसाय करून उद्योजक बनतील असा विश्वास यावेळी अभिजित पाटील यांनी व्यक्त केला

राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाचा इतिहास सांगताना माणस जोडण्याची सामाजिक व्याख्या सांगितली अर्जुनराव चव्हाण यांनी संघटनेचे काम काम करताना येत असलेल्या अडीअडचणीची पोलखोल करताना महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा मांडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष गंगधडे सर आणि सुत्रसंचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले व प्राजक्ता शिंदे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments