पंढरपूर प्रतिनिधी : -
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई यांच्या वतीने IEDSSA अंतर्गत दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी लठठे पॉलीटेक्निक सांगली येथे घेण्यात आलेल्या Inter Engineering Diploma Student Sport Association (IEDSSA)W1-Zone क्रीडा स्पर्धेमध्ये ‘गोळा फेक’ या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यातील १५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये न्यु सातारा समुह, मुंबई संचलित,न्यु सातारा पॉलीटेक्निक कोर्टी पंढरपूर येथील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. गौरी तानाजी धनवडे हिने या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविले तसेच ‘थाळी फेक’ या स्पर्धेत कु. मयुरी तुकाराम चव्हाण हिने द्वितीय पारितोषिक पटकाविले. पारितोषिक पटकाविलेल्या दोन्हीही विद्यार्थिनींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक व अभिनंदन करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम (नाना) निकम विश्वस्थ डॉ. विश्वस्त डॉ.लक्ष्मिकांत निकम व संचालक मंडळ व संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, कॉलेजचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, तसेच विद्यार्थिनींना लाभलेले क्रीडा शिक्षक प्रा. दिग्विजय रणदिवे व श्री. गणेश पडवळकर तसेच क्रीडा प्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रजिस्ट्रार श्री. सतिश दिंडूरे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल बाड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांना पुढील आंतर –विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
0 Comments