LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवानंद खांडेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड

 पंढरपूर/मंगळवेढा : - 



मंगळवेढा तालुक्यातील मौजे कात्राळ/कर्जाळ येथील शिवानंद विठ्ठल खांडेकर यांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाल्याबद्दल पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदूर येथील कार्यस्थळावर नूतन फौजीचा अभिनंदन पर सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम संरक्षण सेवा असणाऱ्या भारत मातेच्या सेवार्थ माझ्या मतदारसंघातील एक जवान रुजू होत असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याची भावना आवताडे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी संचालक  राजनभैय्या पाटील, सरपंच विजयदादा माने, माजी संचालक बापूराव उर्फ पप्पू काकेकर, एच. आर. मॅनेंजर डी. बी. बळवंतराव सो, दत्तात्रय रणे, सिद्धू रेवे,यलगोंडा रेवे, .रवी रेवे सुरेश खांडेकर, अनिल माने बाळू कदम, बिराप्पा खताळ, जकराया नरूटे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments