LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटणजवळ भीषण अपघात,

 पुलावरून ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉरच्युनर.

 



   पंढरपूर ( प्रतिनिधी) : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. फलटणजवळील पुणे - पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली.फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

यात गाडी पुलावरून ३० फूट खोल खड्ड्यात गेली. पनवेल कर्जत जखमी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते.

या घटनेत आमदार जयकुमार गोरे किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीमधील २ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर २ दोघे किरकोळ जखमी आहेत. आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक किरकोळ जखमी आहेत.

दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आमदार जयकुमार गोरे यांना पुण्याच्या रुबी हास्पिटलला हलवण्यात आलं आहे. त्यांच्या छातीला मार लागल्यानं त्यांना पुण्याच्या रुबी हाॅस्पिटलला हलवण्यात आलं आहे. आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. पोलीस सध्या या घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

Post a Comment

0 Comments