LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाळवणीत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गुलालाच्या कार्यक्रम संपन्न

 

पंढरपूर प्रतिनिधी :- 



पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात रविवारी पहाटे ५ - ५५ मिनिट या शुभमुहूर्तावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या १०९ व्या पुण्यतिथी निमित्त गुलाल व पुष्पवृष्टी कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सेवेकरी सलीम तांबोळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी भगवान चौगुले,नितीन शिंदे,मनोज म्हेत्रे,बाळू कलढोणे, डॉ.नवनाथ खांडेकर,दगडू म्हेत्रे,गजानन माने,प्रवीण लिंगडे,अक्षय म्हेत्रे,पुरुषोत्तम निराळी,राजाभाऊ शिंदे, शशिकांत देशपांडे,प्रशांत माळवदे ,दत्ता जाधव,माणिक पाटील,मोहन पाटील,विलास पाटील,प्रभाकर शिंदे,दत्ता लाले,लहान मुले,महिला व ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाळवणी व परिसरातील भाविक भक्तांनी या गुलालाच्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भक्त मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केला.

Post a Comment

0 Comments