पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. पंढरपूर या बँकेची निवडणूक जाहीर झाली असून सदरची निवडणूक ही पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर केले.
अनेक वर्षांपासून परिचारक घराण्याची सत्ता असलेली पंढरपूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे.
सदर बँकेचे सभासद ३३,७०६ असून
दि.२१ ते २७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरण्यात येणार असून २८ डिसेंबर रोजी छाननी होणार आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत आहे.
यासाठीचे मतदान २२ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
याबाबत पंढरपूर येथे पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की अनेक वर्षांपासून परिचारक घराण्याची सत्ता असलेल्या बँकेचा कारभार विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानीने सुरु असून कार्यकर्त्यांना तसेच राजकारण्यांना मोठ्या स्वरूपांचे कर्ज देत असल्याने बँक रसा तळाला गेली असल्याचा आरोप केला आहे.
याचबरोबर अनेक वर्षांपासून सभासदांनाही लाभांश दिला गेला नाही. सभासदांना कोणत्याही स्वरूपाचे कर्ज दिले जात नाही. राजकारण्यांचा पाहुणचार करण्यासाठी बँकेकडून भरम साठ खर्च केला जात आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घेतले जात नसल्याने कामगाराची पिळवणूक केली जात आहे.
पंढरपूर अर्बन बँक वाचवण्यासाठी आपण पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडी कडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळीमनसे नेते दिलीप बापू धोत्रे,मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,पंढरपूर नगरपालिका विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, मनसेचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक नानासाहेब कदम, नगरसेवक शिवाजी मस्के, नगरसेवक लखन चौगुले,नगरसेवक मोहम्मद उस्ताद, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, मनसेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, कृष्णा मासाळ, उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर,मनसेचे शहर उपाध्यक्ष महेश पवार इत्यादी उपस्थित होते.
0 Comments