राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते श्री. धनंजय रामचंद्र जोशी आज आपल्या ४१ वर्षाच्या वृत्तपत्र वितरण व्यवसायातून सेवानिवृत्त झाले.
श्री. धनंजय जोशी यांचे वडील जेष्ठ पत्रकार कै. रामभाऊ जोशी यांनी वैयक्तिकरित्या प्रतिकूल व राजकीयदृष्ट्या अवघड परिस्थितीत, दै. तरुण भारत पुणे व नंतर सोलापूर तरुण भारतचे पत्रकार व विक्रेते म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच श्री. शेखर जोशी व श्री. धनंजय जोशी यांनी वडिलांचे खांद्याला खांदा लावून एकनिष्ठेने संपूर्ण पंढरपूर तालुक्यात दैनिक तरुण भारतचा नावलौकिक वाढवला. याकामी कै. लक्ष्मणकाका जोशी यांनीही त्यांना मोलाचं सहकार्य केले. संपूर्ण कुटुंब वृत्तपत्र सेवेत असणे हे विशेष लक्षणीय ठरले.
श्री. धनंजय जोशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज सकाळी प्रभात मंडळाच्या वतीने पंढरपूरातील प्रसिद्ध व्यापारी श्री. प्रभुशेठ खंडेलवाल यांचे हस्ते येथील हॉटेल प्रिया येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभात मंडळाचे सदस्य सर्वश्री डॉ. कमलकिशोर बजाज, डॉ. अशोकराव कोर्टीकर, पाटबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी मोरे, कापड व्यापारी किरणशेठ शहा, जेष्ठ शिक्षक भानुदासजी शिंदे, जेष्ठ पत्रकार रमेश घळसासी, ॲड. संजय ( गुंडू ) ताठे व पान व पानमसाल्याचे व्यापारी युन्नुसभाई देवळे उपस्थित होते.


0 Comments