LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कैद्यांच्या सुविधांसाठी समाजसेवक संजय ननवरे यांचा हातभार*

 *


*पंढरपूर सबजेलमध्ये कमालीचा बदल*


पंढरपूर राज्यातील जेलमधील सुविधांचा बोजवारा उडाल्याच्या बातम्या आपण वारंवार ऐकतो. पंढरपूर सबजेलमध्ये मात्र कमालीचा बदल करण्यात आला असून, या ठिकाणचे वातावरण कैद्यांना निश्चितच भावणार आहे. हे काम लोकवर्गणीतून करण्यात आले असून, याकामी समाजसेवक संजय ननवरे यांनीही हातभार लावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर सबजेलमधील वातावरण म्हणावे तितके आल्हाददायक नव्हते. येथील इलेक्ट्रिक वायरिंग जागोजागी निकामी झाले होते. कैद्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही नव्हती. या सबजेलमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्याचा निर्णय झाला. निवासी नायब तहसीलदार श्रोत्री, पोलीस निरीक्षक खांडेकर आणि त्यांचे पथक कामाला लागले. हे काम लोकवर्गणीतून करावयाचे असल्यामुळे, साहजिकच संजय ननवरे यांचे नाव पुढे आले. संजय ननवरे यांनीही मोकळ्या मनाने या कामी आर्थिक सहकार्य केले.

सबजेलच्या भिंतीस रंगरंगोटी झाली, इलेक्ट्रिक वायरिंग बदलून झाले, जुन्याच फर्निचरमधून नवीन लाकडी फर्निचर बनवण्यात आले. देवदेवतांच्या प्रतिमा भिंतीवर रेखाटण्यात आल्या, याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरही बसवण्यात आले आणि सबजेलमध्ये अमुलाग्र बदल झाला.




पंढरपूर शहरातील गोरगरिबांना मदत करणाऱ्या संजय ननवरे यांनी, पंढरपूर सबजेलच्या सुधारणेसाठीही

हातभार लावला आहे. येथील कैद्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. त्यांच्यासाठी पाणी फिल्टर मशीनही बसवण्यात आले असून, याचे सर्व श्रेय नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनाच जात आहे.

Post a Comment

0 Comments