पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आलीआहे.. शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजता बँक बंद केल्यानंतर शनिवार,रविवार सुट्टी असल्याने आज सोमवार सकाळी ९.३० वाजता कर्मचारी बँक उघडण्यास आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला..
सुमारे ०३ लाख रुपयांच्या रोख रकमेसह दोन लाख रकमेच्या सोन्याची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे..
चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शन कट केलं आहे.. यासोबत सायरनचे कनेक्शनही कट केलं असल्याची माहिती आहे.. घटनास्थाळावर पोलीस दाखल झाले होते.. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री एकट्या इस्मास गाठून मोबाईल , मौल्यवान वस्तू,सोने पळविण्यात येत असून तक्रार करू नये यासाठी मारहाण केली जाते.


0 Comments