पंढरपूर (प्रतिनिधी) दि पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत आम्ही उडी घेतली असल्याने परिचारक आता कुरघोडी करून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी समोरासमोर लढत द्यावी. असा इशारा मनसे चे श्री दिलीप बापू धोत्रे यांनी मंगळवार दि २७ डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार भवन येथे दिला.यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, कोळी समाजाचे नेते अरुण कोळी, नगरसेवक लखन चौगुले, मंदार बडवे, बजरंग थिटे, संजय बंदपट्टे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, संतोष कवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे माहिती सांगताना धोत्रे म्हणाले, निवडणुकीची यंत्रणा संशयास्पद वाटत असून निवडणूक निर्णय अधिकारी व बँक प्रशासन टोलवाटोलवी करीत आहेत. आम्ही सर्व १७जागेवर निवडणूक लढवीत आहोत. सर्व सक्षम उमेदवार दिले आहेत. बँकेचा एन पी ए किती आहे .हे लपवून ठेवले आहे.असे ते म्हणाले, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी बँकेच्या कारभारावर टीका करून परिचारक हे हिटलर शाही करून कारभार चालवतात असे त्यांनी सांगितले.


0 Comments