LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कारमधून पावणे दोन लाखाची गोवा दारु जप्त

  

*सांगोल्यातही ७ पेट्या देशी दारु जप्त*

*ढाब्यावरही धाड*


पंढरपूर (प्रतिनिधी):-


नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारुविरोधात मोहिम राबविण्यात येत असून २९ डिसेंबर रोजी सांगोल्याच्या पथकाने एका मारुती 800 कारमधून ७ पेट्या देशी दारु तर ३० डिसेंबरला सोलापूरच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यात इंडिगो कारमधून २५ पेट्या गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त केली आहे.

 सविस्तर वृत्त असे की, नविन वर्षाच्या निमित्याने अवैध व बनावट दारुला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निरिक्षक सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह ३० डिसेंबर शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडीदारफळ ते काटी रोडवर सापळा रचून एका टाटा इंडिगो क्र. MH 12 CD 4572 मधून गोवा बनावटीचे इंपेरियल ब्ल्यू व्हिस्की विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या १२०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात एक लाख एंशी हजार किंमतीची दारु जप्त केली असून आरोपी परमेश्वर शहाजी बदाले, रा. नारी ता. बार्शी व संदिप फुलचंद पवार, रा. रातंजन ता. बार्शी यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरिक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले, प्रियंका कुटे व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने केली. 

तसेच २९ डिसेंबर रोजी दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह सांगोला तालुक्यातील एखतपूर गावाच्या हद्दीत मारुती 800 क्र. MH 12 AN 1736 या कारमधून देशी दारु स्पेशल संत्रा ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या ३३६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या. सदर गुन्ह्यात तेविस हजार पाचशे वीस किंमतीची दारु जप्त केली असून अब्दुल रऊफ हिरालाल शेख, रा. सांगोला या इसमाला अटक केली असून त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने२९ डिसेंबर रात्रीच्या सुमारास जुना कुंभारी नाक्यावरील जय अंबिका बिर्याणी हाऊस या ढाब्यावर धाड टाकून होटेल चालक पांडुरंग अर्जुन सामल, वय २७ वर्षे  व त्याठिकाणी दारु पित बसलेले ग्राहक नितिन अर्जुन सामल, विशाल अंबादास कंकुर्टी व आकाश अंबादास मंजुळकर या ३ मद्यपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना मा. न्यायालयात दाखल केले असता मा. न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय, सोलापूर श्री. डी.आर. भोला यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला प्रत्येकी रू. २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. दोन हजार असा एकूण ३१ हजारांचा दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. संतोष पाटील यांनी मा. न्यायालयात बाजू मांडली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक  आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटील, सहायक दुय्यम निरिक्षक मयूरेश भोसेकर, जवान नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत, मलंग तांबोळी व वाहनचालक मारुती जडगे  यांच्या  पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments