(प्रतिनिधी) पंढरपूर येथे सिमेंट क्षेत्रात अव्वल स्थानी असणाऱ्या जे के सिमेंट या कंपनीच्या वतीने गुरूवार दि २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकात हॉटेल राधेश येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कंपनीचे स्टेट हेड श्री राजेश देशपांडे यांनी कंपनीची नवीन उत्पादने, विविध गुणवत्ता, ताकद असणारे सिमेंटचे प्रकार याची माहिती दिली. जे के सिमेंट कंपनी आता पेंट क्षेत्रात पदार्पण करत असून सर्व प्रकारचे पेंट्स (रंग) तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कंपनीचे अधिकारी श्री महेश बेंद्रे यांनी तांत्रिक सेवांबाबत माहिती देऊन विक्रेत्यांनी याचा उपयोग करून घ्यावा असे सांगितले.
कंपनीने कॉन्ट्रॅक्टर यांच्या पाल्यांसाठी प्रोत्साहन देणारी योजना केली आहे, याद्वारे इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षेत ८० टकके पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रमाणपत्र व रोख बक्षीस दिले जाणार आहे. असा अभिनव उपक्रम राबविणारी जे के सिमेंट ही एकमेव कंपनी आहे. या डीलर व रिटेलर मेळाव्यात वाखरी,वेळापूर, महुद,भाळवणी, भंडी शेगाव, मरवडे या भागातील ७० विक्रेते उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे अधिकारी चंदन जवळगेकर, अझहर निगडे, विवेक हजारे, पंकज साखरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments