चंद्रभागेतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती
पंढरपूर शहर व तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावातुन खुलेआम अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर व सुसाट वेगाने जाणाऱ्या वाळू चोरीच्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता लक्षात घेत कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष,व वंचित बहुजन आघाडीचे अरुणभाऊ कोळी यांनी २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनापासून अवैध वाळू चोरीवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.याची दखल घेत सुशील बेल्हेकर यांनी अरुण कोळी यांना पत्र देत पंढरपूर शहर परिसरातून चंद्रभागेच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस,नगर पालिका कर्मचारी व महसूल कर्मचारी यांचे संयुक्त पथक तर ग्रामीण भागातील वाळू चोरी रोखण्यासाठी मंडल अधिकारी याचा समावेश असलेली ११ पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती देत २६ जानेवारी रोजी पासून करण्यात येणारे उपोषण स्थगित करावे अशी विनंती केली आहे.
0 Comments