चालू प्रवाह असतानाही १२ तास रहदारीच्या रस्त्यावर राहिली लटकत
*महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी नाही वेळ तर सर्वच अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद*
*महावितरण करून मात्र अक्षम्य दुर्लक्ष*
पंढरपूर प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यातील देगावमध्ये गेल्या दोन महिन्यात चार ते पाच वेळा विजेची तार तुटून घरावर पडली आहे किंवा चालू प्रवाह असताना बारा बारा तास रस्त्यावर लटकत राहिली आहे.मात्र तब्बल चार ते पाच वेळा इतकी गंभीर बाब होऊनहीं महावितरणच्या गावातील कर्मचारी व गुरसाळे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अक्षमपणे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तसेच वीज प्रवाह चालू असताना तार तुटल्यावर याबाबत महावितरणला कळवूनही अनेकांच्या जीवाला धोका असतानाही गावातीलच कंत्राटी असणाऱ्या वीज कर्मचाऱ्याकडून मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने महावितरणला नेमका नागरिकांचा बळी घ्यायचा आहे का असा प्रश्न या भागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
देगाव गावातील महादेव मंदिर परिसरात महावितरणचे अनेक तारांचे खांब व त्यावरील तारा ह्या लोक वस्तीतून व घरावरून गेलेल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून या तारा बदललेल्या नसल्यामुळे तसेच लूज तारा एकमेकांना चिकटून होणाऱ्या सततच्या स्पार्किंग यामुळे या तारा खराब झालेले आहेत.आठवड्यातून किमान एकदा तरी या तारा तुटून लोंबकळत असल्याने जीवाला धोका असल्याबाबत अनेक नागरिकांनी गेल्या चार ते पाच महिन्यात शेकडो तक्रारी केलेल्या असल्या तरीही वीज कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच लोकवस्तीत तुटलेल्या प्रवाहीत तारा तात्काळ बाजूला सारून जोडून देणे गरजेचे असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून ही तार जोडण्यासाठी तब्बल 12 ते 15 तास लावले जात आहेत.त्यामुळे दिवसा जरी या तारा तुटल्या अगर कोणताही विजेचा घोटाळा झाला तरी मला वेळ नाही,उद्या जोडू,मी कामात आहे,मी बाहेर आहे असे मुद्दामहून सांगत टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे महावितरणला नक्की कोणाचा जीव गेल्यावर जाग येणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच महावितरणचा कर्मचारी व गुरसाळे विभागाचे अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे शेकडो कुटुंबांना विनाकारण जीव धोक्यात घालून अंधारात राहावे लागत आहे.त्यामुळे याबाबत महावितरण काय कारवाई करते ते पाहणे आवश्यक आहे
*चौकट*
याबाबत महावितरणच्या गुरसाळे विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता सर्वांचेच संपर्क क्रमांक बंद आढळून आले. गुरसाळे सबस्टेशनचा नंबरही बंद आढळला.तसेच पंढरपूर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता मी आजारी असल्याने रजेवर आहे.सर्वांचे नंबर बदलले आहेत.माझ्याकडेही त्यांचा नंबर नाही असे उत्तर देण्यात आले.त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नक्की कुणाशी संपर्क साधावा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
0 Comments