LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री कालिका देवी इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल ,पंढरपूर. पालक सभा व आरोग्य शिबिर संपन्न.

 


कासार विचार मंच संचलित श्री कालिका देवी इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल, पंढरपूर. येथे रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता पालक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिरही संपन्न झाले .

   श्री कालिका देवी इंग्लिश मीडियम प्रि प्राइमरी स्कूल, पंढरपूर. येथे झालेल्या पालक सभेच्या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्टर प्रशांत प्रताप उबाळे व डॉक्टर स्नेहा प्रशांत उबाळे यांनी आरोग्य तपासणी करून सोबतच्या पालकांना वैयक्तिक योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच या तपासणीनंतर सर्व पालकांना मुलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना मुलांना भरपूर खेळू द्या. रोजचे ताजे घरचे अन्न जेवावस द्या. जीवनात भाजीपाल्यांचा भरपूर वापर करा. तसेच दिवसातून दोनदा जेवण्यास देण्याऐवजी त्यांना तीन-चार वेळा खाण्यास द्या म्हणजे त्यांचे शरीर सुदृढ होईल. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ  वर्ज करा आणि जंक फूड तर खाऊच नका. मैद्याचे पदार्थ बिस्किटे व बेकरी पदार्थ याची सवय मुलांना लावू नका. भरपूर पाणी पिण्यास द्या. अशा प्रकारे आरोग्याची काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले डॉक्टर उबाळे पती-पत्नी यांनी केले.

  आरोग्य तपासणी नंतर वर्गशिक्षिका पल्लवी कोकीळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे प्रात्यक्षिक दाखवले .यामध्ये इंग्रजी, मराठी पाढे मराठी, इंग्रजी पोएम आणि नृत्य सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुलांमध्ये देश प्रेमाचे बीज रुजावे  म्हणून या वयापासूनच या मुलांमध्ये राष्ट्रगीताचे संस्कार केले जातात.या सर्व सादरीकरणावरती पालक समाधानी झाले तर उपस्थित  संचालक प्राध्यापक अशोक डोळ शिक्षण समिती सदस्य श्री अनिल कंदले गुरुजी, शिक्षण समिती सदस्य श्री राजीव कोल्हापूरे सर यांनी मुलांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले .तर शाळेचे आधारस्तंभ डॉक्टर श्री विलास हरपाळे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट देण्यात आले .

   कार्यक्रमाचे प्रारंभी श्री कालिकामातेच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन या शाळेचे आधारस्तंभ डॉक्टर श्री विलास हरपाळे व  सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार करून सर्व मुलांना, पालकांना उपस्थित मान्यवरांना संक्रांत कालावधीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने तिळगुळाचा कार्यक्रम करण्यात आला .या कार्यक्रमास कासार विचार  मंचचे  उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कासार, डॉक्टर श्री रमाकांत दगडे, सचिव श्री कालिदास अष्टेकर ,प्राचार्य मैंदरगे सर, प्राध्यापक अशोक डोळ ,श्री अनिल   कंदले गुरुजी, श्री संजय डोळ, श्री भारत शेठ कोकीळ ,श्री राजू कोल्हापुरे सर ,श्री सुनील पालकर ,श्री अशोक नळे सर, श्री शुभम गाडे ,श्री सतीश शेटे, श्री शिवराज अंदुले, श्री प्रदीप वानरे, रवींद्र काटकर व सर्व पालक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments