आयुष्यमान भारत योजना, (प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा) लाभ गरजू नागरिकांना व्हावा या हेतूने कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या संपर्क कार्यालयात सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्र शासनाची ही योजना १ एप्रिल २०१८ पासून देशभरात सुरु केली पण भरपूर लोकांपर्यंत पोहोचली नाही किंवा लोकांना ती अजूनही समजली नाही. दारिद्रय रेषेखालील व आर्थिक मागास घटकातील कुटुंबांना वार्षिक पाच लाखाची वैद्यकीय सेवा मोफत देण्याच्या हेतूने शासनाने ही आरोग्य विमा योजना सुरु केली आहे. योजना सुरु करण्यापूर्वीच लाभार्थ्यांची यादी शासनाने निश्चित केली आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारावर विविध निकष वापरुन ही यादी बनविण्यात आली आहे. देशातील १० कोटी कुटुंबाना म्हणजेच साधारण ५० कोटी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यात आल्याची कल्पनाच नसल्याने ते ह्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे आढळून येते. म्हणूनच यादीत नाव आहे की नाही हे तपासून नाव असणाऱ्यांसाठी कार्ड बनवून देण्याची सुविधा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने उपलब्ध करुन दिली आहे.
काल दिवसभर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी अकरा वाजले पासून संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत हे कार्य चालू होते, लोकांना जसे निरोप जात होते किंवा त्यांना जसे समजत होते तसे लोक येऊन नोंदणी करून घेत होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर मंगळवेढा संपर्क प्रमुख मा.दिवाकर जी भटकळ साहेब, पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लंकेश काकासाहेब बुराडे यांनी ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य काल आणि आज दिवसभर चालू ठेवले.
या कार्यात गुरुदेव अष्टेकर, प्रशांत बागडे यांच्या परिश्रमामुळे आलेल्या नागरिकांना सुविधा पुरविण्यात सुलभता आली.
काल यादीतील नावे शोधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे - ३० ते ४० टक्के लोक असे होते ज्यांचे यादीत नाव नव्हते. नाव नसणाऱ्यांचे नाव आत्ता समाविष्ट करता येऊ शकत नाही हे सांगणे कठीण जात होते. अनेकांना वाटायचे मतदार यादीत आमचे नाव आहे, आमच्याकडे आधारकार्ड आहे, रेशनकार्ड आहे तरी, या यादीत कसं काय नाव नाही ?
ही यादी केंद्र शासनाने निश्चित केलेली आहे. त्यामध्ये नवीन नाव नोंदविण्याची कोणतीही पध्दत नाही. असो.
ज्या लाभार्थींची नावे यादीत आहेत त्यांची सेवा घडतेय याचे समाधान आहेच. काल पहिल्या दिवशी यादीत नाव असलेले असे साधारण ५७ लाभार्थी आले. त्यापैकी ४९ जणांची प्रक्रिया पूर्ण झाली. आज सोमवार दिनांक १६ रोजी सकाळी ११ पासून संध्याकाळी ६ यावेळेत ही सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली.
लवकरच पुढील महीण्यात ही योजना राबवणार असून शासकीय योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी सांगितले.


0 Comments