पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेचे जेष्ठ शिक्षक मा.श्री.भारत आदमीले सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकनियुक्त आमदार समाधान दादा आवताडे यांनी उपस्थित राहून श्री.आदमीले सर यांना मानाचा फेटा बांधून हार, शाल घालून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार महोदय यांनी बोलताना सांगितले शिक्षक म्हणजे शि - म्हणजे शिस्तप्रिय,क्ष - क्षमाशील,आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष, तर शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्या कडून भावी पिढी घडवली जाते.
तसेच आपण ही आता पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवून त्यांची भविष्य उज्वल करून दिले.आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सदर प्रसंगी श्री. मुख्याध्यापक हरदास सर, प्रा.शरद चव्हाण सर,श्री. कांबळे सर,श्री. कुसुमडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments