LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गावगुंडांनी बंद केलेला रस्ता भा ज पा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी खुला केला.

 


पंढरपूर(प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यात बिटरगाव पुनर्वसन हे गाव असून उजनी धरणामध्ये जमिनी घरदार गेल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1972 साली या गावच्या नागरिकांना अजनसोंड ,सुस्ते परिसरात पुनर्वशीत केले छोटे छोटे शेतकरी शेतमजूर या गावांमध्ये गुण्या गोविंदाने राहत असतात या गावाकडे जाणारा तिर्हैमार्ग रस्ता ते बिटरगाव हा रस्ता ग्रामपंचायत मार्फत सोळा वर्षांपूर्वी खडीकरण केले पुनर्वसन खात्यांना यावर पुन्हा एकदा खर्च करत रस्ता तयार केला सदर रस्ता एका खाजगी इसमांकडून ग्रामपंचायतीने विकत घेतला होता परंतु त्याच्या उताऱ्यावरून सदर रस्त्याची जागा कमी झाली नव्हती पुन्हा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काटेरी बाभळीचे फाटे टाकून गेल्या एक महिन्यापासून हा रस्ता बंद केला होता नागरिकांना दमदाटी करत होता खोटी केस करण्याची धमकी देत होता एकाच माणसांने संपूर्ण गाव वेटीस धरलं होतं या गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पोलीस प्रशासनाकडे व महसूल प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या तहसीलदारांनी येऊन पाहणी केली परंतु निकाल लागत नव्हता तारीख पे तारीख असेच असाच प्रकार चालला होता नागरिकांना येणे जाणे करणे दवाखान्यात जाणे रोजच्या व्यवहारासाठी पंढरपूरला येणे अत्यंत अवघड झाले होते आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांना गावात बोलवले संपूर्ण गाव एकत्र जमून हनुमान मंदिरासमोर बैठक घेतली गावकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडा व आमच्या हक्काचा रस्ता खुला करूनदेण्याची विनंती केली महिला व ग्रामस्थ एकत्र जमले होते प्रचंड रोष प्रचंड जनतेमध्ये दिसुन येत होता माऊली हळणवर यांनी यावेळी बोलताना तुमच्या हक्काचा रस्ता आहे या रस्त्याला महाराष्ट्र शासनाने खर्च केलेला आहे खडीकरण केले आहे त्यामुळे कोणाला या रस्ता अडवता येणार नाही तुम्ही सगळे जण सोबत येत असाल तर मी स्वतः त्या ठिकाणी टाकलेल्या काटेरी कुंपण काढून रस्ता खुला करून देतो  काय गुन्हा दाखल व्हायचा आहे तो होऊ द्या असे आवाहन करताच संपूर्ण  गावच्या ग्रामस्थांनी या आव्हानाला प्रतिसाद दिला  महिलांनी पुढे होत तात्काळ काटेरी कुंपण काढून रस्ता खुला केला यावेळी गेल्या एक महिन्यापासून बंद असलेला रस्ता मोकळा झाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी सरपंच सरीता भाऊसाहेब धुमाळ , बाबा साहेब धुमाळ ,हरिदास मोहिते बापूसाहेब महानवर ,उस्मान तांबोळी ,विलास सरडे ,संतोष धुमाळ ,अनिल खंदारे बाळासाहेब यादव ,छबुबाई राखुंडे, पुष्पा धनवे, रंजना मोहिते, अनुसया पन्हाळकर ,सविता पवार ,कविता पवार  ,शिवाजी जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments