पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमधील उत्कृष्ट काम करीत असलेल्या 12 महिला सफाई कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह वाटप पंढरपूर अर्बन बँकेच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संगीता पाटील व डॉ. मैत्रयी केसकर यांच्या शुभहस्ते उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळुजकर, कार्यालय अधीक्षक सुवर्णा डमरे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर,तनुजा सीतफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोना सोलंकी प्रतिभा सोलंकी जमुना सोनवणे,सुवर्णा जाधव,शैला पाटोळे,माया यादव,अरुणा वाघेला,शांताबाई वाघमारे,नंदा चंदनशिवे,विजया,गायकवाड, जया वाघेला,मंगल यादव यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना डॉ संगिता पाटील यांनी सांगितलं की, पंढरपूर शहरांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी वर्षभर अनेक भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर मध्ये येत असतात सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी हे आपले काम प्रामाणिकपणे करत असतात हे काम करत असताना सर्व महिलांनी आपलं आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने चांगला आहार घेणे आवश्यक आहे तो आहार पौष्टिक आणि चौरस असला पाहिजे असे सांगून महिलांचे आजार त्यावरील उपाय याबाबतही मार्गदर्शन केले तसेच आदर्श शिक्षिका डॉ मैत्रयी मंदार केसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाजातील महिला ही सक्षम झाली पाहिजे परंतु नुसतं सक्षम न होता आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे महिलांच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे खरंतर महिला या आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी अतिशय झटत असतात परंतु पुरुष प्रधान संस्कृतीनुसार जो त्यांना मान व न्याय मिळाला पाहिजे तो समाजात मिळत नाही आजही दुय्यम स्थान म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते व चूल आणि मूल या पुरतेच स्त्रीचा कडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा आहे त्यामुळे महिलांनी प्रथम स्वतः मध्ये बदल केला पाहिजे कारण असे म्हटले जाते की ज्याच्या हाती दोरी ती जगास उध्दारी त्यामुळे महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज आहे यावेळी NULM चे संतोष कसबे यांनी सफाई कर्मचारी यांना बचत गटाबाबत माहिती दिली
यावेळी सुवर्णा डमरे व तनुजा सिताफ यांच्या शुभहस्ते डॉ. संगीता पाटील व डॉ.मैत्रयी केसकर यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खरेदी पर्यवेक्षक सचिन मिसाळ, को ऑर्डीनेटर अभिजित घाडगे, कृष्णात जगताप,संतोष कसबे, योगेश काळे व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे स्वागत सुवर्णा डमरे व आभार नागनाथ तोडकर यांनी मानले.


0 Comments