द्राक्षायन भाग २_
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा साध्यातला साधा कर्मचारी कमी वेळात आरसीसी घर बांधतो शहराचे उपनगरात प्लॉट घेतो आपल्या बँक खात्यात बक्कळ पैसा जमा करून ठेवतो हे कशा प्रकारे होते याचे उत्तरच आणि उत्तरीत आहे कोणत्या मार्गाने सध्या कर्मचारी पैसे कमवतात याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे यांचे बँक ट्रांजेक्शन तपासले तर हे सर्व काही उघड होणार आहे.
गेली अनेक वर्षे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे लेखा परीक्षण म्हणजेच ऑडिट झालेले नाही. पण यावर समिती काहीच बोलत नाही. समितीला कोट्यवधी रुपयांचा देणगी भाविकांकडून मिळत असताना,गोरगरीब भाविकांसाठी समिती काय सुविधा देते? हा प्रश्नच आहे.
शिर्डी, अक्कलकोट, गोंदवले येथील महाप्रसाद योजना बघितले तर किती कल्पक सुविधा दिल्या जातात हे दिसून येते. याउलट पंढरपूर येथे भाविकांना वाईट अनुभव येतो, आधी एक वेळचेच भोजन दिले जायचे , आता काही दिवसांपूर्वी दोन वेळा देण्याचा निर्णय घेण्यात आला पण अनेकदा यात मंदिर समितीचे कर्मचारी, नातेवाईक, पंढरपूर शहरातील काही लोक दिसतात. समिती कर्मचारी अनेक गोष्टीत मनमानी कारभार करताना दिसून येतात. कोरोना लॉकडाऊन काळात मंदिर बंद असतानाही अधिकारी, कर्मचारी यांच्या कृपेने काही धनाढ्य, प्रतिष्ठित लोक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेत होते. एका आमदार पुत्राने वरपर्यंत वशिला लाऊन मंदिर उघडायला लाऊन ट्रॅक्टर कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. प्रामाणिक राहून कार्य करणारे अधिकारी येथे टिकत नाहीत. कोरोना काळात नाहीत.
दरम्यान तत्कालीन कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल उर्फ सुनील जोशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ही बदली का केली? याचे उत्तर मिळू शकेल नाही? २०१४ साली मंदिर सरकारच्या संपूर्ण ताब्यात आल्यानंतर केवळ दोन वर्षातच अचानक समिती कर्मचाऱ्यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली. एक सर्वसामान्य कर्मचारी चार-चार प्लॉट एवढ्या कमी पगारात कसे काय घेऊ शकतात, श्री विठ्ठल रुक्मिणी माते चरणी अर्पण करण्यात आलेले तूप, मौल्यवान वस्तू ,पदार्थ कुठल्या सदस्याच्या घरात मागच्या दाराने जातात. याची माहिती घेतल्यास अनेक धक्कादायक गैरप्रकार उघड होतील...(क्रमश..)



0 Comments