. पंढरपूर (प्रतिनिधी) भारताची दक्षिण काशी म्हणून सुप्रसिध्द असलेल्या पंढरपूर शहरात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी वाढत आहे. पंढरपूर शहरात उन्हाळी सुट्टी ची गर्दी वाढत असताना तृतीयपंथीय भिक्षेकऱ्यांची गर्दी वाढत असून चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पश्चिम द्वार, प्रदिक्षणा रोड,महाद्वार, नदीचे वाळवंट , नवी पेठ भाजी मार्केट आदी परिसरात असे अनेक तृतीयपंथीय लोक शहरात आलेल्या भाविक भक्तांना व नागरिकांना पैसे मागताना दिसून येत आहेत. याच प्रमाणे विविध प्रकारच्या दुकानदारांना, फिरत्या विक्रेत्यांना अडवून पैसे मागितले जातात, आणि ते न दिल्यास शिवीगाळ, प्रसंगी मारहाण , गैरवर्तन केले जात आहे.
थोडे पैसे दिले तरी यांचे समाधान होत नाही, ठराविक रक्कम न दिल्यास शिव्या शाप, वाईट बोलले जाते. शहरातील नवी पेठ भागातील मंडई परिसरात असे अनेक तृतीयपंथीय आदळतात,हे लोक अनेक गोरगरीब भाजी विक्रेत्यांकडून पैसे, फुकट भाज्या, फळे उचलून घेऊन निघून जातात. नदी पात्रात अडवून, दादागिरी करून रक्कम उकळली जाते,न दिल्यास भाविकांचे कपडे,मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या जातात. घाणेरडे शब्द वापरून शिवीगाळ केली जाते. नवी पेठ भागात तेथील
दुकानदारांनी पैसे न दिल्यास सरळ त्याचा किंमती वस्तू, माल हिसकावून घेतला जातो,उगाच ऐन गर्दीत कशाला डोक्याला ताप म्हणून अनेक विक्रेते, दुकानदार तक्रार करीत नाहीत, आणि याचा गैरफायदा ते घेत आहेत, भाविक भक्तांना व दुकानदारांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पोलिसांनी त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

0 Comments