, पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घटना.
(प्रतिनिधी) ऐन उन्हाळ्यात पंढरपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर विविध अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत तर अनेक जखमी झाले आहेत. भरधाव एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले आणि कारला फरफटत नेल्याची घटना पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घडली. या अपघातात कारचालकासह दोघे जण जखमी झाले. कारचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कटफळ (शेरेवाडी) स्टॉपजवळ घडला. कार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे (३५) व केदारी भागवत पाटील, (वय ४५, दोघेही रा. निमगाव, ता. माढा), अशी जखमींची नावे आहेत. पंढरपूर परिसरातील सर्व महामार्ग हे पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने सिमेंट चे व गुळगुळीत बनविण्यात आले आहेत. रस्ते गुळगुळीत बनविण्यात आले आल्याने मोटारसायकल सह सर्व प्रकारची चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावत असतात. वाहनांवर नियंत्रण नसल्याने आणि टायर फुटल्याने अनेक अपघात राष्ट्रीय महामार्गावर होत आहेत. करकंब परिसरात गर्दीत भरगाव ट्रक घुसल्याने दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाला होता.


0 Comments