LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निर्जला एकादशी चे महत्व: सविस्तर माहिती

 


ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला सर्वोच्च धार्मिक महत्त्व आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत पाळणे खूप लाभदायी असते, भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

या एकादशीच्या शुभ मुहूर्तावर निर्जल व्रत ठेवल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती वाढते. हे व्रत केल्यानं तुमच्या सर्व अपूर्ण मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशी 31 मे रोजी आहे. वर्षातील सर्व एकादशींपैकी ही सर्वात कठीण मात्र तितकीच शुभ मानली जाते.

जो कोणी हे व्रत मनोभावे करून दानधर्म करतो त्याला विष्णूचा आशीर्वाद मिळतो. हे व्रत पाळण्याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले असून या दिवशी कोणते काम अशुभ आहे हे देखील सांगितले आहे. आधी या व्रताची पूजा पद्धत जाणून घेऊ. निर्जला एकादशी व्रताचे विधी निर्जला एकादशीचे व्रत, नियम व संयम यांचे पालन करून एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथीपासूनच प्रारंभ केला जातो.

भगवान विष्णूंना पितांबरधारी मानले गेले आहे, म्हणून त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टी असण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळी फळे आणि पिवळी मिठाई अर्पण करून श्रीहरीची पूजा करा. पूजा करताना चौरंगावर पिवळे वस्त्र पसरून भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून पंचामृताने स्नान करावे आणि नंतर पिवळी फुले, पिवळे तांदूळ आणि फळे अर्पण करावीत. सर्व पदार्थ अर्पण केल्यानंतर एकादशीची कथा वाचावी आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.

शेवटी श्री हरीची आरती करून पूजेची सांगता करावी. दिवसभर भक्तिभावाने उपवास केल्यानंतर संध्याकाळी स्नान करून पुन्हा परमेश्वराची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा. या पद्धतीने व्रत आणि उपासना केल्यानं निर्जला एकादशी व्रताचे पूर्ण फळ मिळेल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील.

तुळशीची पूजा करताना अनेकांच्या हातून या चुका होतात; नशिबाची नाही मिळत साथनिर्जला एकादशीला चुकूनही अशी कामे करू नका - निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रार्थना करून आपल्या दिनचर्येला सुरुवात करावी. निर्जला एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.

जे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. निर्जला एकादशीच्या दिवशी केस कापणे, मुंडण करणे आणि नखे कापणे, ही कामं देखील निषिद्ध मानली जातात. निर्जला एकादशीच्या दिवशी कांदा-लसूण सारखे तामसिक गोष्टी खाऊ नयेत. तुमच्या घरात कोण उपवास केला नसला तरी कांदा-लसूण वापरू नका.

निर्जला एकादशीच्या दिवशी या नियमांचे पालन करणाऱ्यांवर विष्णूची कृपा होऊन त्यांना सदैव सुखी आणि समृद्ध राहण्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

Post a Comment

0 Comments